Chetan Hazare make plan 'jail break' of Nagpur Jail 
नागपूर

चेतनने केला होता ‘जेल ब्रेक’चा प्लॅन, पोलिसांवर करणार होते गोळीबार

अनिल कांबळे

नागपूर : बोले पेट्रोल पंपाजवळ झालेल्या बिनेकर हत्याकांडातील प्रमुख आरोपी कुख्यात गुंड चेतन हजारे याने नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेला सुरुंग लावत पहिल्या ‘जेल ब्रेक’चा कट रचला होता. सराफा दुकानांना लुटणाऱ्या राजा गौस याला कारागृहातून पळून जाण्यासाठी मदत करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, तयारीपूर्वीच गुन्हे शाखेने चेतनचा डाव उधळला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात चेतन हजारे एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात होता. तेथे त्याची कुख्यात दरोडेखोर आणि देशीकट्टा विक्रेता राजा गौस याच्याशी ओळख झाली. राजा गौसने त्याला देशीकट्टे कुठे मिळतात आणि नागपुरात कसे आणायचे याबाबत माहिती दिली. तेव्हापासून चेतन राजा गौसचा फॅन झाला. काही दिवसानंतर राजा गौस याने मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्याची योजना आखली. 

त्यासाठी चेतनला मदत मागितली. त्यावेळी कारागृहातील सुरक्षारक्षकांना सेट करून कैदी मोबाईल बरॅकमध्ये ठेवत होते. राजा गौसने चेतनशी मोबाईलवरून संपर्क करीत कारागृहातून पळून जाण्यात मदत मागितली होती. चेतननेही लगेच होकार दिला. आपल्या पाच साथीदारांना प्लॅनमध्ये सहभागी केले. भरदुपारी मुलाखत कक्षाजवळून जेलब्रेक करण्याचे ठरले. त्यासाठी चेतनच्या टोळीने तयारी केली होती.

गौसने पुरविले देशीकट्टे

चेतनने जेल ब्रेक करण्यास होकार देताच त्याला राजा गौसने मध्यप्रदेशातील साथीदारांकडून ५ ते ६ देशीकट्टे दिले होते. जेल ब्रेक यशस्वी झाल्यानंतर राजा चेतनाला ५० लाख देणार होता. तसेच त्यानंतर राजासोबत ‘राईट हॅंड’ म्हणून काम करणार होता. राजा गौसने कारागृहातही यासाठी तयारी केली होती, अशी माहिती आहे.

पोलिसांवर करणार होते गोळीबार

दुपारी चेतन आणि टोळी कारागृहाच्या अगदी गेटसमोर येणार होते. मुलाखत कक्षाजवळ राजा उभा राहणार होता. त्यानंतर गौसला बाहेर काढायचे. टोळीने देशी कट्ट्याने पोलिसांवर गोळीबार करायचा. कारागृहाबाहेर दोन पल्सर उभ्या ठेवायच्या आणि दोन वेगवेगळ्या दिशेने पळून जायची योजना चेतनने आखली होती.

गुन्हे शाखेने उधळला डाव

गुन्हे शाखेच्या एका हवालदाराला जेलमधील खबऱ्याने राजा गौसच्या प्लॅनची माहिती दिली. एक एपीआय आणि हवालदाराने चेतनचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चेतनकडून गुन्हे शाखेने देशीकट्टा जप्त केला. त्याने जेल ब्रेक करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रशासनाला राजा गौसबाबत माहिती देण्यात आली. गौसला लगेच दुसऱ्या बरॅकमध्ये हलविण्यात आले होते. 

संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT